प्रकरण 3-ब-मागणीची लवचिकता

इयत्ता 12 वी - अर्थशास्त्र                                                    प्रकरण 3- ब -      मागणीची  लवचिकता
(Elasticity of demand)
            स्वाध्याय
प्रश्न 1. खालील विधाने पूर्ण करा.
1) रेषीय मागणी वक्रा वरील 'क्ष 'अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता---- 
   अ) शून्य  ब)एक  क) अनंत  ड)Ed>1
उत्तर-पर्याय-अ) शून्य
2) रेषीय मागणी वक्रा वरील 'य ' अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता----------अ) शून्य  ब)एक  क) अनंत  ड) Ed<1
उत्तर -  पर्याय - क) अनंत
3)'क्ष 'अक्षास समांतर असलेला किंमत  लवचिकत़ेचा मागणी वक्र------------
अ) संपूर्ण लवचिक मागणी 
ब) संपूर्ण अलवचिक मागणी
क) जास्त लवचिक मागणी
ड) कमी लवचिक मागणी
उत्तर -पर्याय-अ) संपूर्ण लवचिक मागणी
4) किमतीतील बदला पेक्षा मागणीतील बदलांचे प्रमाण जास्त असते, तेव्हाहा असणारा माग वक्र--------------------
अ) पसरट  ब) तीव्र उताराचा 
क) आयताकृती परीवलयाचा 
ड) समांतर
उत्तर -पर्याय- अ) पसरट
5)Ed=0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू----------
अ) सुखसोईच्या  ब) सर्वसाधारण
क) जीवनावश्यक   ड) अत्यावश्यक
उत्तर - पर्याय  अ) जीवनावश्यक

प्रश्न 2) योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक 
शब्द सुचवा :
1) फक्त उत्पन्नातील  बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल.
उत्तर- मागणीची उत्पन्न लवचिकता
2)एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूंच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम.
उत्तर - मागणीची छेदक लवचिकता
3) किमतीतील बदलांमुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल.
उत्तर- मागणीची किंमत लवचिकता
4) मागणीतील अनंत बदलांमुळे होणारी लवचिकता.
उत्तर - संपूर्ण लवचिक मागणी
5) किमतीतील शेकडा बदलाच्या बदलाच्या प्रमाण इतकीच वस्तूच्या मागणीत शे कडा बदल घडविणारी लवचिकता .
उत्तर - एकक लवचिक मागणी

प्रश्न- 3) खालील सहसंबंध पूर्ण करा.
1) संपूर्ण लवचिक मागणी :Ed= ळ ::-----------Ed=0
उत्तर-संपूर्ण अलवचिक मागणी
2) परिवलयाचा मागणी वक्र :----------:: 'क्ष'अक्षाकडे झुकणारा तीव्र उताराचा मागणी वक्र : कमी लवचिक मागणी
उत्तर- एकक लवचिक मागणी
3) सरळ रेषेतील मागणी वक्र : लिनिअर मागणी वक्र  ::-------------  अरेखीय मागणी वक्र
उत्तर- वक्राकार मागणी वक्र
4) पेन व शाई :--------------::  चहा, कॉफी: पर्यायी वस्तू
उत्तर-पूरक वस्तू
                                     मा. शे. बदल
5) गुणोत्तर पद्धत : मा.ल.=----------------
                                      कि .शे .बदल
                                      मा. वक्र खालचे
                                         अंतर
:: ----------:  बिंदू  मा. ल.=------------------                                          मा . वक्र वरचे
                                            अंतर 
उत्तर - बिंदू पद्धत/ भूमिती पद्धत

प्रश्न 4) विधान आणि तर्क प्रश्न
1) विधान 'अ 'एका चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते.
तर्क विधान ' ब 'मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील मागणी वर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शविते.
पर्याय  
अ) विधान ' अ 'सत्य आहे , पण तर्क विधान ' 'ब 'असत्य आहे.
ब) विधान 'अ 'असत्य आहे, पण  तर्क विधान ' 'ब ' सत्य आहे.
क) दोन्ही विधाने सत्य असून विधान ' ब' हे  विधान 'अ ' योग्य स्पष्टीकरण आहे.
ड) दोन्ही विधान सत्य असून विधान ' ब ' हे विधान ' अ ' योग्य स्पष्टीकरण नाही.
उत्तर-पर्याय- क)
2) विधान 'अ ' : एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो.
तर्क विधान ' ब ' : उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो
पर्याय- अ) विधान  'अ 'सत्य  आहे, पण तर्क विधान  ' ब 'असत्य आहे.
ब) विधान ' अ 'असत्य आहे , पण तर्क विधान '  ब ' सत्य आहे.
क) दोन्ही विधाने सत्य असून विधान ' ब ' हे विधान 'अ 'चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ड) दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब ' हे विधान 'अ '  चे योग्य स्पष्टीकरण नाही.
उत्तर -पर्याय-  ड)
3) विधान ' अ ': कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एका पेक्षा कमी असते.
तर्क विधान ' ब ' किमतीतील बदलांच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलांचे प्रमाण कमी असते.
पर्याय :अ) विधान ' अ ' सत्य आहे , पण तर्क विधान ' ब 'असत्य आहे.
ब) विधान ' अ 'असत्य आहे, पण तर्क विधान '   ' ब ' सत्य आहे .
क) दोन्ही विधाने  सत्य असून विधान 'ब'हे विधान    'अ ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ड) दोन्ही विधाने सत्य असून विधान ' ब ' हे विधान ' अ ' चे योग्य स्पष्टीकरण नाही .
उत्तर - पर्याय - क)
प्रश्न 5 फरक स्पष्ट करा.
प्रश्न-6) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न -1) मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा.
उत्तर- मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक पुढीलप्रमाणे-
1) वस्तूचे स्वरूप- 
                           मागणीची लवचिकता वस्तूच्या स्वरूपावर निर्धारित होते. वस्तूच्या स्वरूपानुसार जीवनावश्यक वस्तू, सुखसोयीच्या वस्तू आणि चैनीच्या वस्तू असे वर्गीकरण केले जाते. जीवनावश्ययक वस्तू उदा. अन्नधान्य , औषधे ,मीठ यांचीी मागणी अलवचिक किंवा कमी लवचिक असते. याउलट मोटार गाडी, सौंदर्यप्रसाधने ,उंची फर्निचर ,यासारख्या सुखसोईच्या आणि चैनीच्या वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते.
2) पर्यायी वस्तूंची उपलब्धता- 
                                जेव्हा बाजारात ज्या वस्तूला पर्याय उपलब्ध असतात अशा वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते उदा. शीतपेयांना अनेक पर्याय उपलब्ध असल्याने त्यांची मागणी जास्त लवचिक आहे. याउलट ज्या वस्तूला पर्याय उपलब्ध नसतात त्यांची मागणी लवचिक असते उदा.-मिठाची मागणी

3) वस्तूचे  उपयोग-
                     एकाच उपयोगासाठी असणाऱ्या वस्तूची मागणी कमी लवचिक असते .याउलट विविध उपयोगी वस्तूंची मागणी जास्त लवचिक असतेे .उदाा- विजेची मागणी.
4) व्यसनी वस्तू/ सवयीच्या वस्तू--
                  एखाद्या वस्तूचा उपभोग घेण्याचे व्यसन किंवा सवय असेल तर अशा वस्तूंची मागणी कमी लवचिक असते.
5) टिकाऊपणा-
                 टिकाऊ वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते उदा.- फर्निचर ,दूरदर्शन संच इत्यादी.  याउलट नाशवंत वस्तूंची मागणी
 कमी लवचिक असते .उदा.- भाजी, फळे, दूध, अंडी, मांस इत्यादी.
6)  पूरक वस्तू--
          एकच गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंना मागणी केली जाते अशा पूरक वस्तूंची मागणी अलवचिक असते. उदा.-मोबाईल हँडसेट व सिम कार्ड यांची मागणी
7) उपभोक्त्याचे उत्पन्न-
            उपभोक्त्याची उत्पन्न पातळी उच्च असल्यास वस्तूंची मागणी कमी लवचिक किंवा अलवचिक असते.
8) गरजेची तीव्रता-
           ज्या वस्तूची गरज अधिक तीव्र असते त्या वस्तूंची मागणी कमी लवचिक असते.उदा.-औषधे . याउलट ज्या वस्तूंची गरज कमी तीव्र असते त्या वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते.
9) कालावधी-
        अल्पकाळात उपभोक्त्याची विशिष्ट वस्तू साठी असणारी मागणी कमी लवचिक असते. दीर्घकाळात उपभोक्ता स्वस्त व पर्यायी वस्तूंची मागणी करू शकतो त्यामुळे दीर्घकाळात मुळ वस्तूची  मागणी जास्त लवचिक होते.
10) उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण-.                         ज्या  वस्तूवरील खर्चाचे  एकूण उत्पन्नातील प्रमाण कमी असते त्या वस्तूची मागणी अलवचिक असते. उदा.- वर्तमानपत्र.  याउलट ज्या वस्तूंंवरील  खर्चाचेेे प्रमाण जास्त असते , त्याा वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते.

प्रश्न - 2) मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा.

उत्तर- 
         प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत मांडली आहे या पद्धतीत एखाद्या वस्तूच्या मूळ किमतीला वस्तुवर होणारा मूळ खर्च आणि वस्तूच्या बदललेल्या किमतीला त्यावर होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजली जाते
    पद्धत पत्रकाद्वारे स्पष्ट करता येते
यासंदर्भाभात  प्रा. मार्शल यांनी खालील संकल्पना मांडल्या आहेत.
अ) जास्त लवचिक मागणी-
                जेव्हा वस्तूच्या किंमतीतील बदलांमुळेेे एकूण खर्चात वाढ होते तेव्हा मागणी जास्त लवचिक असते.
वरील पत्रकात ' ' स्थितीमध्ये मूळ किंमत 10रुपये यावेळी मूळ मागणी 6 नगांची आहे त्यामुळे वस्तूवर 60 रुपये एवढा एकूण खर्च आहे आणि जेव्हा किंमत 20 रुपये पर्यंत वाढते तेव्हा मागणी 5 नगा पर्यंत कमी होते त्यामुळे 100रुपये एवढा एकूण खर्च होतो. हा खर्च मूळ खर्चापेक्षा जास्त असल्याने मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे. (Ed > 1)
ब) एकक लवचिक मागणी -
        जेव्हा किंमत कमीी होते किंवा वाढते तेव्हााा वस्तूवरील एकूण खर्चात बदल होत नाही म्हणजेे खर्च स्थिर रहातो तेव्हा  त्यास एकक लवचिक मागणी म्हणतात.
पत्रकातील'ब 'स्थिती ही बाब आढळते. (Ed=1)
क) कमी लवचिक मागणी-
        जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलांमुळे एकूण खर्चात घट होते तेव्हा ती कमी लवचिक मागणीी असते.
पत्रकातील ' क 'स्थितीत 50 ₹ मूळ किंमत आहे त्यावेळी मागणी 2 नग आहे यावेळी एकूण खर्च 100 ₹ आहे आणि किंमत 60 ₹ पर्यंत वाढते तेव्हा मागणी 1 नगा पर्यंत घटते तेव्हा एकूण खर्च 60₹ एवढा आहे हा एकूण खर्च मूळ खर्चा पेक्षा कमी असल्याने मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी आहे. (Ed <1)

प्रश्न -  3) मागणीच्या लवचिकतेचे महत्व विशद करा.
उत्तर -मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व पुढीलप्रमाणे-
1) उत्पादकास उपयुक्त-
            उत्पादकास वस्तूची किंमत विषयक धोरण ठरविताना मागणी लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते. यामध्ये उत्पादकाच्या वस्तूची मागणी अलवचिक किंवा कमी लवचिक असते तेव्हा उत्पादक अशा वस्तूंची किंमत वाढवू शकतो व त्याद्वारे अधिक नफा मिळवू शकतो कारण अलवचिक मागणी मुळे मागणी घटण्याचा धोका नसतो. याउलट उत्पादकाच्या वस्तूची मागणी जास्त लवचिक असते तेव्हा उत्पादक अशा वस्तूची किंमत थोडी कमी करून मागणीत जी जास्त वाढ होते त्याचा फायदा त्याला घेऊ शकतो. 
२) शासनास उपयुक्त-
                शासनास /अर्थमंत्र्यांंना कराचे धोरण ठरविताना मागणीच्या लवचिकतेेची संकल्पना उपयुक्त ठरते . यामध्ये ज्या वस्तू व सेवांची मागणी  मागणी कमी लवचिक असते अशा वस्तू व सेवा वर अधिक कर आकारणी करून महसुलात वाढ करू शकते उदा . - मदय , सिगारेट यासारख्या व्यसनी वस्तूवर अधिक कर आकारून शासन महसूल वाढविते .
3 )उत्पादक घटकांचे मोबदले ठरवताना उपयुक्त -
         उत्पादक घटकांचे मोबदले ठरविताना मागणीच्या लवचिकता संकल्पनेचा उपयोग होतो .यामध्ये ज्या उत्पादक घटकांची मागणी कमी लवचिक असते अशा उत्पादन घटकांना अधिक मोबदला प्राप्त करून घेणे शक्य होते .
उदा . -  उच्चबुद्धिमत्ता व कौशल्यावर आधारित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक वेतन प्राप्त करून घेणे शक्य होते . याउलट अकुशल कामगारांची मागणी जास्त लवचिक असल्याने त्यांना कमी  वेतनावर काम करावे लागते .
4 ) विदेशी व्यापारात उपयुक्त -
           आंतरराष्ट्रीय व्यापारातील नियम व अटी निश्चित करण्यासाठी मागणी लवचिकता संकल्पना उपयुक्त ठरते यामध्ये ज्या देशातील ज्या वस्तूंची मागणी अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अलवचिक असते ते देश आपल्या वस्तूंची किंमत वाढवून निर्यात करतात व फायदा मिळवितात उदा . ओपेक -या पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या या संस्थेने पेट्रोलियम पदार्थांची मागणी अलवचिक आहे हे लक्षात घेऊन अनेक वेळा किंमत वाढीचे धोरण स्वीकारले आहे .
5 )सार्वजनिक उपयुक्ततेच्या सुविधा ठरविण्यासाठी -
         देशातील लोकांचे कल्याण साध्य होण्यासाठी मूलभूत वस्तू व सेवांचा पुरवठा सरकार स्वतः करते कारण अशा वस्तूंचा पुरवठा खाजगी उद्योजकांकडे दिल्यास ते त्या वस्तू व सेवांची अलवचिक मागणी लक्षात घेऊन त्यांच्या जास्त किंमत आकारून लोकांचे शोषण करू शकतात म्हणून रेल्वेसेवा ,विज , एल. पी .जी .गॅॅॅस इत्यादींचा पुरवठा सरकार मार्फत केला जातो .

प्रश्न 7 -खालील हा कृतींचे निरीक्षण करा आणि आणि प्रश्नांची उत्तरे लिहा :

1) खालील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा आणि स्पष्ट करा .
उत्तरे
आकृती - अ -संपूर्ण अलवचिक
स्पष्टीकरण -यामध्ये किंमत कमी व जास्त झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही मागणी स्थिर आहे .यावेळी हा मागणी वक्र 'अ य ' अक्षास समांतर आहे .
आकृती ' ब ' -संपूर्ण किंवा अनंत लवचिक स्पष्टीकरण -यामध्ये किमतीत अल्प बदल झाले तरी मागणीत अनंत बदल होतात यावेळी मागणी वक्र 'अक्ष 'समांतर आहे .
 आकृती - ' क ' -एकक लवचिक
स्पष्टीकरण -यामध्ये किमतीत ज्या प्रमाणात बदल होतात त्याच प्रमाणात मागणीतील बदल आहेत .
आकृती - ड -जास्त लवचिक
स्पष्टीकरण - यामध्ये किमतीत ज्या प्रमाणात बदल झाले आहेत त्यापेक्षा जास्त बदल मागणीत झाले आहेत .

2 )आकृती मधील ' म म ' रेषीय मागणी वक्र आहे . आकृतीच्या आधारावर खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा व त्याची कारणे स्पष्ट करा .
विधाने -
  1) ' म 3' या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे .
2 ) ' म1 ' या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे 
3 ) ' म 2 ' या या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे .
4 ) ' म ' या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे .
 उत्तरे -
1)असत्य
कारण - ' म म 'या रेषीय मागणी वक्रावरील 'म3म4' हे अंतर ' म3 म '  यापेक्षा तकमी एक आहे. 'म3' हा बिंदू ' क्ष ' अक्षाच्या अधिक जवळ आहे .म्हणून  ' म3 'या विंदूवर मागणी अधिक लवचिक नसून कमी लवचिक आहे.

2) असत्य
कारण- ' म म 'या रेषीय मागणी वक्रावरील ' म1म 4 ' हे अंतर ' म1 म ' पेक्षा जास्त आहे. म्हणजेच ' म1 ' हा बिंदू ' य ' अक्षाच्या अधिक जवळ आहे. म्हणजेच 'म1 ' हा बिंदू '  ' य ' आणि  ' क्ष ' अक्षापासून समदुर नाही. त्यामुळे ' म1 '  या बिंदूवर मागणी एकक लवचिक नसून जास्त लवचिक आहे. 
3) 'म म ' या या रेषीय मागणी वक्रा वरील ' म2म4 ' हे अंतर ' म2 म ' इतकेच आहे. म्हणजेच ' म2 ' बिंदू ' य 'आणि ' क्ष 'अक्षा पासून समदूर आहे. त्यामुळे ' म 2 ' या बिंदुवर मागणी कमी लवचिक नसून एकक लवचिक आहे .

4 ) सत्य
कारण - ' म म 'या रेषीय मागणी वक्रा वरील ' म ' बिंदूच्या ठिकाणी मागणी वक्राचा ' म म 4 ' हा खालील भाग आहे व ' ' म ' या बिंदूच्या वर मागणी वक्राचा कोणताही भाग नाही .म्हणजेच 'म म 4 ' हे अंतर जास्त व  ' म ' बिंदूच्या वरील भागाचे अंतर कमी म्हणजेच शून्य आहे .म्हणजेच '   ' म ' हा बिंदू ' य ' अक्षावर आहे . त्यामुळे '  '  म ' बिंदूच्या ठिकाणी मागणी संपूर्ण लवचिक आहे.
_________________*_______________
            धन्यवाद !!!!!
अर्थशास्त्र अभ्यास मंडळ व सदस्य
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर


      



Popular posts from this blog

इ.12वी प्रकरण-3-मागणीचे विश्लेषण- घटक-मागणीचा अर्थशास्त्रीय अर्थ